fbpx

पाणी फाऊंडेशन (१ मे)

१ मे रोजी जागतिक कामगार दिन व महाराष्ट्रदिनानिमित्त पाणी फौंडेशन ने चला गावाकडे हा उपक्रम घेतला होता. या वेळी उन्नति सोशल फाउंडेशन च्या २०० सभासदांनी पुरंदर तालुक्यातील पानवडी गावात श्रमदान केले. पाणीसंकटावर मात करण्यासाठी हा उपक्रम घेण्यात आला होता. यामध्ये उन्नति सोशल फाउंडेशन ला प्रथम पारितोषिक मिळाले होते.

वृक्षारोपण (२ जुलै)

२ जुलै २०१८ रोजी उन्नति सोशल फाऊंडेशन ने “एकच लक्ष, १०,००० वृक्ष” हा कार्यक्रम हाती घेतला घेतला. या कार्यक्रम अंतर्गत पिंपळे सौदागर येथील सोसायटी मध्ये वृक्ष लावण्यात येणार आहेत. हे वृक्ष लावण्याआधी त्या सोसायटी ची परवानगी घेऊन, वृक्ष लावणीसाठीची जागा निश्चित करून हे वृक्ष लावण्यात येतील. वाढत्या शहरीकरणामध्ये निसर्गसंवर्धनासाठी सर्वांनी हात भर लावावा हाच संदेश सौ. कुंदाताई भिसे यांनी या वेळी दिला होता.  

डॉक्टर्स डे (३ जुलै)

परमेश्वर एकदाच जन्म देतो आणि पुढे डॉक्टरांच्या रूपाने आपली जन्मभर काळजी घेतो. म्हणूनच डॉक्टर्स डे चे औचित्य साधून उन्नती सोशल फाऊंडेशन तर्फे रुग्णसेवा करणाऱ्या सर्व डॉक्टरांना ग्रीटिंग देऊन त्यांचे आभार मानले. नागरिकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या समाजातील या महत्वाच्या घटकासाठी उन्नति सोशल फाऊंडेशन ने त्यांना या दिवशी मानवंदना दिली.

ऋणानुबंध - परिवार एकीकरण (7 जुलै)

कुटुंबातील व्यक्तींचे नाते एकमेकांशी कसे असावे, कुटुंबातील व्यक्तींनी कसे वागावे जेणेकरून आजच्या २१ व्या शतकात कुटुंब एकत्रित राहू शकते असे अनेक विचार मांडणाऱ्या वकील अपर्णाताई रामतीर्थकर यांच्या भाषणाचा कार्यक्रम उन्नति सोशल फाऊंडेशन तर्फे घेण्यात आला होता. यावेळी उपस्थितांनी भावुक होऊन या कार्यक्रमाला भरभरून दाद दिली.

मनमंदिरा - कीर्तन महोत्सव (30 जुलै ते 1 ऑगस्ट)

झी टॉकीज आणि उन्नति सोशल फाउन्डेशन यांच्या संयुक्त विद्यमाने “मनमंदिरा” हा भव्य कीर्तन महोत्सव घेण्यात आला होता. झी टॉकीज ने या संपूर्ण कार्यक्रमाचे शूटिंग करून हा कार्यक्रम रसिकांसाठी टीव्ही वर सुद्धा दाखविण्यात आला होता. अनेक तरुण कीर्तनकारांचा सहभाग या कार्यक्रमामध्ये पाहावयास मिळाला होता. तरुण कीर्तनकारांनी ही नवीन पिढी कीर्तनातून समाजसुधारणा या आपल्या खूप जुन्या संस्कृतीला विशेष दर्जा मिळवून देईल. अनेक मान्यवरांनी या कार्यक्रमास भेट देऊन उन्नतीच्या कामाची प्रशंसा केली होती.     

तिरंगा सन्मान यात्रा (१५ ऑगस्ट)

स्वातंत्र्यदिनानिमित्त उन्नति सोशल फाऊंडेशन तर्फे “तिरंगा सन्मान यात्रा” आयोजित करण्यात आली होती. यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. यात्रेत परिसरातील अनेक आबालवृद्धांनी सहभाग घेतला. “भारत माता की जय” “वंदे मातरम” घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. या वेळी लहान मुलांनी वेगवेगळ्या क्रांतिकारकांच्या वेशभूषा साकारल्या होत्या. क्रांतिकारकांबद्दल माहिती सांगताना ही मुळे देशाभिमानाने ओतप्रोत झालेली होती. या लहानग्यांची मिरवणूक सुद्धा काढण्यात आली.  

रक्षा बंधन (२६ ऑगस्ट)

“देशसेवा हीच ईश्वर सेवा” असे मानून दिवस रात्र आपल्या देशाच्या सीमेचे रक्षण करणारे जवान सामान्य माणसासारखे विविध सण प्रत्येक वेळी आपल्या घरी साजरे करू शकत नाहीत आणि म्हणूनच देशसेवा करणाऱ्या आपल्या जवानांना उन्नति सोशल फाऊंडेशनच्या महिला सभासदांनी रक्षाबंधनाच्या दिवशी देशाचे व जनतेचे रक्षण करणारा एक मोठा भाऊ म्हणून राखी बांधली. जवानांनी सुद्धा भावुकपणे याचे स्वागत केले.

केरळ पूरग्रस्तांना मदतीचा हात (३० ऑगस्ट)

केरळ मधील उद्भवलेल्या भीषण पूरपरिस्थिती उन्नतिने सर्वा नागरिकांना मदत करण्याचे आव्हाहन केले होते. त्यासाठी दानपेटी  उन्नति सोशल फाऊंडेशन कार्यालय व निळू फुले नाट्य सभागृहाच्या प्रवेशद्वारापाशी ठेवण्यात आली होती. दानपेटीमध्ये लोकवर्गणीतुन १६,१०० रुपये तसेच उन्नति सोशल फाऊंडेशन आणि यशदा डेव्हलपर्स यांच्याकडून ८३,९०० अशी एकूण १ लाख रुपये रक्कम जमा झाली होती. ही रक्कम पिंपरी चिंचवड विधानसभा आमदार मा. श्री. लक्ष्मणभाऊ जगताप यांचे बंधु शंकर शेठ जगताप (माजी नगरसेवक) यांच्या हस्ते पुढे केरळच्या चीफ मिनिस्टर डिस्ट्रेस रिलीफ फंड मध्ये जमा करण्यात आली.

शिक्षक दिन (५ सप्टेंबर)

“मास्तर म्हणजे आईच्या पातळीवर जाऊन जीव लावणारा, जीवनाचा स्तर उंचावणारा व्यक्ती” असे शिक्षकांबद्दल उद्गार श्री. संजय भिसे यांनी केले आणि सर्व उपस्थित भावुक झाले. या दिवशी सनफ्लॉवर पब्लिक स्कूल, मारुंजी येथे उन्नति सोशल फाऊंडेशन ने शिक्षक दिन साजरा केला होता. या वेळी सरस्वती पूजनानंतर उन्नतिचे संस्थापक श्री. संजय भिसे यांनी शिक्षकांना मार्गदर्शन करीत त्यांना तुळशीचे रोप व भेटवस्तू दिल्या. विद्यार्थ्यांच्या लेझीम व ढोलपथकाने सर्वांचे मनोरंजन करून शाबासकी मिळवली.

उन्न "ती" चा गणपती महोत्सव (१३ ते २३ सप्टेंबर)

नवनवीन उपक्रम व त्याजोगे समाजकार्य हे उन्नति सोशल फाऊंडेशन चे कार्य सर्वांनी जाणले होते आणि म्हणूनच अनेक नागरिक उन्नतिचे सभासद बनून पुढील कार्यक्रमांना हातभार लावत होते. या वर्षी गणपती उत्सवासाठी उन्नति सोशल फाऊंडेशन उन्न ‘ती’ चा गणपती महोत्सव, पिंपळे सौदागर मधील पहिला महिलांचा मानाचा गणपती” हा अनोखा उपक्रम राबविला. समाज्यामध्ये सर्व स्त्रिया ज्या गृहिणी आहेत, नोकरी करणाऱ्या आहेत किंवा एखाद्या मोठ्या हुद्द्यावर काम करून एक संस्था सांभाळणाऱ्या आहेत अशा सर्व स्त्रिया एकत्रित येऊन हे पहिले गणपती मंडळ सुरु केले. सर्व स्त्रियांचा सन्मान उन्नति सोशल फाऊंडेशन अशाप्रकारे करणारे बहुदा एकमेव सोशल फाऊंडेशन आहे.  उन्नति महिला मंडळाने गणेशोत्सवामध्ये विविध उपक्रम घेतले. गणेशा कार्यशाळा, EcoFriendly विज्ञान प्रदर्शन, EcoFriendly गौरीगणपती सजावट स्पर्धा, तसेच लहान मुलांसाठी विविध स्पर्धा असे उपक्रम घेण्यात आले. गणेशोत्सव सुरु असताना मंडळाच्या गणपतीच्या आरतीचा मान अंध व अपंग मुली, महिला डॉक्टर व नर्सेस, महिला पोलीस अधिकारी, विधवा महिला, गृहनिर्माण सोसायटी महिला अध्यक्षा, महिला सफाई कामगार, तृतीय पंथी अश्याप्रकारच्या समाजातील सर्व स्त्रियांना देण्यात आला.  

EcoFriendly गणेशा", एक कार्यशाळा (९ सप्टेंबर)

उन्नति सोशल फाऊंडेशन नेहेमीच पर्यावरणपूरक कार्यक्रम घेत आले आहे. उन्नति तर्फे  बाप्पाचे स्वागत शाडूच्या मातीने बनविलेल्या गणपती मूर्तीने केले व खऱ्या अर्थाने पर्यावरण रक्षणासाठी आपला खारीचा वाट दिला.

त्यासाठीच उन्नति सोशल फाऊंडेशन तर्फे “EcoFriendly गणेशा”, एक कार्यशाळा घेतली ज्यामध्ये लहान मुलांना शाडूच्या मातीचा गणपती कसा बनवायचा याचे प्रशिक्षण दिले गेले आणि गणपती बनविण्याचे सर्व साहित्य सुद्धा उन्नति सोशल फाऊंडेशन तर्फे मोफत पुरविण्यात आले.

उन्नति नवरात्री उत्सव (१०-१९ ऑक्टोबर २०१९)

उन्नति सोशल फाऊंडेशन तर्फे नवरात्री उत्सव वेगळ्या पद्धतीने साजरा केला ज्यामध्ये नवरात्रीच्या नऊ वेगवेगळ्या रंगांना उद्देशून नऊ नऊ वेगवेगळे उपक्रम हाती घेऊन कौतुकास्पद कामे करून समाजकार्याला एक नवे रूप दिले.
नऊ वेगवेगळ्या रंगांचे नऊ वेगवेगळे उपक्रम
दिवस पहिला: रंग निळा (लेखणी हेच हेच विचार व्यक्त करण्याचे सर्वश्रेष्ठ साधन)
दिवस दुसरा: रंग पिवळा (ट्राफिक नियम पाळा अपघात टाळा उपक्रम)
दिवस तिसरा: रंग हिरवा (वृक्षारोपण उपक्रम)
दिवस चौथा: रंग करडा (प्रदूषण निर्मूलनासाठी सायकल रॅली)
दिवस पाचवा: रंग केशरी (उन्नति ची सोफेश धडफळे सेंटर मधील अनाथ विद्यार्थ्यांना मदत)
दिवस सहावा: रंग पांढरा (शांततेचा संदेश)
दिवस सातवा: रंग लाल (रक्तदान शिबीर)
दिवस आठवा: रंग आकाशी (घे भरारी उपक्रमांतर्गत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार)
दिवस नववा: रंग गुलाबी (‘ती’ चा सन्मान करा उपक्रम)

वसुबारस (०४ नोव्हेंबर)

वसुबारस निमित्त उन्नति सोशल फाऊंडेशनच्या वतीने उन्नति सोशल फाऊंडेशन कार्यालय, जर्वरी सोसायटी येथे गाय व वासरु पूजा आयोजित केली होती.

स्वरामृत दिवाळी पहाट (5 नोव्हेंबर)

उन्नति सोशल फाऊंडेशन तर्फे दिवाळीनिमित्त स्वरामृत दिवाळी पहाटचे आयोजन करण्यात आले होते. गायक कलाकारांनी गायन आणि वाद्यवादनाने उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध करून त्यांची मने जिंकली.
गायक –
ज्ञानेश्वर मेश्राम (सा. रे. ग. म. प. फेम)
भाग्यश्री देशपांडे (गायिका मुंबई)
संगीत अलंकार निवृत्ति दाभेकर गुरुजी
वादक –
संगीत विशारद राधाकृष्ण गरड गुरुजी
संतोष साळवी (तबला वादक)
गंभीर महाराज अवचार – मृदंग वादक
तुषार केळकर – हारमोनियम वादक
या कार्यक्रमाच्या वेळी उन्नति सोशल फाऊंडेशन तर्फे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणास मदतनिघी देण्यात आला.

किल्ले बनवा स्पर्धा (१२ नोव्हेंबर)

लहान मुलांच्या कलागुणांना चालना देण्यासाठी उन्नति तर्फे किल्ले बनवा स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये लहान मुलांना मातीपासून अथवा इतर नैसर्गिक वस्तूं पासून किल्ले बनवायचे होते.

बांधकाम कामगारांच्या मुलांसोबत बालदिन (१४ नोव्हेंबर)

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस हा बालदिन म्हणून साजरा करण्यात येतो, यानिमित्ताने पिंपळे सौदागर येथील उन्नति सोशल फाऊंडेशनच्या वतीने “आधार बाल आंगण” (मजदूर कामगार मुलांची शाळा) शाळेमध्ये बालदिन साजरा करण्यात आला होता. यावेळी या शाळेतील लहान मुला मुलींना खाऊ, चित्रकलेचे साहित्य, व शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले.  या निमित्ताने उपस्थितांना मार्गदर्शन करताना उन्नति सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ. कुंदाताई भिसे म्हणाल्या, आपण ज्या समाजात रहातो त्या समाजाचे काही तरी देणे लागतो ही भावना मनात ठेवून समाजातील सर्वच घटकांनी अशा प्रकारचे कार्यक्रम राबविण्याची काळाची गरज आहे. कामगारांच्या ज्या मुला मुलींना शिक्षणासाठी ज्या गोष्टीची आवश्यकता आहे ते जर शहरातील सामाजिक संघटना, सामाजिक संस्था यांनी पुढाकार घेऊन यांना शालेय साहित्य पुरविले तर खऱ्या अर्थांनी बालदिन साजरा केल्या सारखे होईल.

स्पर्श वात्सल्याचा (१७ डिसेंबर )

उन्नति सोशल फाऊंडेशन व झी युवा वाहिनी यांच्या संयुक्त विद्यमाने “स्पर्श वात्सल्याचा” या वाहिनीच्या शो चे शूटिंग पिंपळे सौदागरच्या काही सोसायटी मध्ये झाले, पिंपळे सौदागर येथे झाले.या शो च्या शूटिंग साठी पिंपळे सौदागरच्या काही चिमुकल्यांनी निवड झाली होती.या शो चे प्रक्षेपण झी युवा या चॅनेल वर झाले होते.

नवं वर्षानिमित्त १५०० रोपांचे वाटप करून नवं वर्षाचे स्वागत (1 जानेवारी)

पिंपळे सौदागर येथील उन्नति सोशल फाऊंडेशनच्या वतीने पिंपळे सौदागर येथील शिवार चौक व खेळाचे मैदान याठिकाणी विविध जातीचे सुमारे दोन हजार झाडांचे मोफत वाटप करून नववर्षाचे स्वागत करण्यात आले. नवीन वर्षाचा नवीन संकल्प म्हणून या स्तुत्य उपक्रमाचे नागरिकांमधून खूप कौतुक झाले.

पतंग बनवा कार्यशाळा (१३ जानेवारी)

उन्नति सोशल फाऊंडेशन तर्फे पतंग बनवा कार्यशाळा आयोजित केली होती. यामध्ये लहान मुलांना टाकाऊ वस्तूंपासून पतंग बनवण्याचे मोफत प्रशिक्षण देण्यात आले.

पिंपळे सौदागर भजन स्पर्धा (४ फेब्रुवारी)

उन्नति सोशल फाऊंडेशन आयोजित सौ. कुंदाताई भिसे व श्री. संजय भिसे यांच्या वाढदिवसानिमित्त ‘विठाई’ भजन स्पर्धा आयोजित केली गेली होती.पिंपळे सौदागर मधील भजनी मंडळांनी उत्स्फूर्थ प्रतिसादामध्ये या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन उपस्थितांची मने जिंकली होती. उत्कृष्ट सादरीकरण व कार्यक्रमाच्या नियोजनामुळे  उपस्थितांनी भजनाचा आनंद घेतला. आता पुन्हा भजनांकडे वाढणारा सर्वांचा कल आपली संस्कृती टिकून ठेवण्यासाठी व ती वाढविण्यासाठी या कलाकारांना प्रोत्साहन देईल हे नक्की.

हळदी कुंकू व स्वर संगीत कार्यक्रम ( ८ फेब्रुवारी)

उन्नति सोशल फाऊंडेशन आयोजित सौ. कुंदाताई भिसे यांच्या वाढदिवसानिमित्त हळदी कुंकू व स्वर संगीत कार्यक्रम आयोजित केले होते. यावेळी महिलांनी हळदी कुंकू व स्वर संगीत कार्यक्रमाचा आनंद घेतला.

अण्णासाहेब मगर विद्यालयातील मुलांचा विद्यार्थ्यांचा मोफत विमा (९ फेब्रुवारी)

उन्नति सोशल फाऊंडेशन च्या वतीने पिंपळे सौदागर येथील महापालिकेची आण्णासाहेब मगर माध्यमिक विद्यालयातील १२९६ विद्यार्थी व प्रत्येकी एक पालक यांचा अपघाती विमा काढण्यात आला आहे.

विमा संरक्षण लाभाची एकूण रक्कम सुमारे ३८ कोटी ८८ लाख रुपये एवढी आहे. अपघाती विमा पॉलिसी उन्नति सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ. कुंदाताई संजय भिसे यांनी माध्यमिक विभागाचे शिक्षण अधिकारी पराग मुंडे यांच्याकडे सुपूर्त केली.

विठाई मोफत वाचनालयाची सुरुवात (९ फेब्रुवारी)

उन्नति सोशल फाऊंडेशन मार्फत पिंपळे सौदागर येथील वाचकांसाठी ” विठाई ” मोफत वाचनालयाची स्थापना केली. यामध्ये मराठी , हिंदी व इंग्रजी अशी मिळून तब्बल १५०० हुन अधिक पुस्तके उपलब्ध केली आहेत. याप्रसंगी वाचनालयाचे उदघाटन पिंपरी चिंचवड शहराचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी केले.

स्वच्छ पवना नदी अभियान (१० फेब्रुवारी)

उन्नति सोशल फाऊंडेशन व रोटरी क्लब ऑफ वाल्हेरकरवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छ पवना नदी अभियान राबवण्यात आले होते. पिंपळे सौदागर येथील दत्त मंदिर येथे सकाळी ८ वाजता या अभियानाची सुरुवात रोटरी क्लब ऑफ वाल्हेरकरवाडी चे अध्यक्ष प्रदीप वाल्हेकर व उन्नति सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ. कुंदाताई संजय भिसे यांच्या हस्ते करण्यात आली. नदीमध्ये असणारा कचरा, जलपर्णी इ. गोळा केला गेला. रोटरी क्लब ऑफ वाल्हेरकरवाडी चे अध्यक्ष प्रदीप वाल्हेकर यांनी नदी आपली माता असून आपणच तिचे रक्षणकर्ता आहोत असे सर्वांना सांगितले, तर कुंदा भिसे यांनी नदी प्रदूषणामुळे होणारा तोटा आणि नदीची झालेली अवस्था कशी सुधारवता येईल यावर मार्गदर्शन केले . अभियानाची सांगता व आभार यंग सिनियर ग्रुप चे अनिल पिंपळीकर यांनी केले.

जागतिक महिला दिना (८ मार्च )

निमित्त पुणे ते दिल्ली सायकल रॅली व आयुर्वेदिक शिबिराचे आयोजन (08 मार्च) उन्नति सोशल फाऊंडेशनच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त पुणे ते दिल्ली अशा सायकल रॅली चे आयोजन करण्यात आले होते. “सशक्त नारी से ही बनेगा सशक्त समाज !!” असा संदेश घेऊन ही सायकल रॅली  १५ दिवसात १५ शहरातून १५०० किमी चा प्रवास करून दिल्ली पर्यंत जाऊन पोहचली. या रॅली मध्ये २५ सायकल पटू सहभागी झाले होते. यामध्ये महिलांचा पण सहभाग होता. तसेच महिला दिनानिमित्त आयुर्वेदिक शिबिराचे आयोजन सुद्धा करण्यात आले होते.

जागतिक चिमणी दिन (२० मार्च )

“उन्नति चं एक पाऊल पक्षी संवर्धनासाठी” आज उन्नति सोशल फौंडेशनच्या वतीने एक पाऊल पक्षी संवर्धनासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. प्रचंड प्रमाणात वाढलेल्या शहरीकरणामुळे पक्षांना होणारी पाणीटंचाई, अन्नाचा अपुरा पुरवठा आणि घरटे बांधण्यासाठी कमी होत चाललेली झाडे या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठीच हा उपक्रम राबविला होता. यावेळी रोज सकाळी आपल्या घरासमोर किलबिलाट करून झोप उडवणाऱ्या पक्षांसाठी पाणी पिण्याची सोय, खायला दाणे व घरटे इत्यादी साहित्य पिंपळे सौदागर येथील बाळासाहेब कुंजीर मैदान येथील झाडांवर ठेवण्यात आले असून एक मोठा सामाजिक संदेश या जोगे देण्यात आला.